भाजप- हिंदू संघटनांचा सरकारला इशारा; अजूनही वेळ गेलेली नाही काय तो सोक्षमोक्ष लावा…
बेळगांव: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
राज्यासह देशात खळबळ माजवलेल्या शेकडो मृतदेह पुरल्याच्या प्रकरणाने धर्मस्थळ ( मंजुनाथ) तीर्थक्षेत्राची विनाकारण बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, यामध्ये कोणतेच तथ्य नाही असेल तर लवकरात लवकर सरकारने त्याचा उलगडा करावा नाही तर भाजप आणि हिंदू संघटना काय? करतील याचा नेम नाही. नंतर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. तत्काळ या प्रकरणाचा तपास न लागल्यास राज्यभर भाजप आणि हिंदू संघटना तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा आज भाजप आणि हिंदू संघटनांनी काढलेल्या मुख मोर्चा आणि निवेदनातून जिल्हाधिकारी महमद रोशन यांच्यामार्फत सरकारला देण्यात आला आहे. गेला आठवडाभर आम्हीं पाहतोय हे नाटक! सांगणारा तो व्यक्ती मुसलमान आहे , त्याला कशी माहिती असणार?हिंदू धर्मस्थळाची असा प्रश्न बेळगांव दक्षिण आमदार अभय पाटील यांनी उपस्थित केला. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने तात्काळ याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा हिंदुं बांधवच काय करतील याचा अंदाज लावणे कठीण आहे, त्याला आम्ही जबाबदार नसेल असा इशारा पाटील यांनी पुढे बोलतांना दिला.
धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली ते राणी चनंमा सर्कलहून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल होवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात देशातच प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मस्थळ (मंजुनाथ) तीर्थस्थळाची ‘मृतदेह दफन’ प्रकरणाने बदनामी होत आहे, यामुळे लाखों हिंदू बांधवांनी मने दुखावली असून, पेशाने एक मुस्लिम असलेला व्यक्ती कसा काय? सांगू शकतील हिंदू स्थळाची माहिती. यात कोणाचे कशे राजकारण आहे, हे आम्हाला माहीत नाही. पण, जे काहीं उठवण्यात आले आहे, त्याचा तात्काळ निपटारा न केल्यास सरकारला महागात पडेल असा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन सादर करतेवेळी दहा हजारहून हिंदू बांधव उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्या घटनास्थळी जावून जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी आंदोलन सरकारला पाठवण्याची हमी दिली. यावेळी जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, माजी खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, बेळगावचे महापौर मंगेश पवार, युवा नेते पंडित ओगले, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, तालुका भाजप सचिव मल्लाप्पा मारीहाळ , गुंडू तोपिनकट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विविध माठधिशांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

प्रतिक्रीया –
एसआयटी पोलिस गेल्या आठवड्यापासून खोदकाम करत आहे, मध्येच हा तपास का? थांबवण्यात आला. काय तो या प्रकरणाचा तपास लावावा अन्यथा आम्हीं गप्प बसणार नाही. याचा सरकारने विचार करावा.
-प्रमोद कोचेरी, जिल्हा भाजप उपाध्यक्ष.
तत्काळ तपास नाहीं लागल्यास जे काय पुढें होईल त्याला सरकार जबाबदार असेल, विनाकारण हिंदू स्थळाची बदनामी केली असल्याने हिंदू बांधवांची भावना दुखावली आहे. या प्रकरणाचा छडा न लावल्यास कायदा हातीत घ्यावा लागेल.
- महंतेश कवठगीमठ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.






Leave a Reply