धर्मस्थळ प्रकरणी आज भाजपची बेळगावात पदयात्रा …


आणखी एक तासानंतर आंदोलनाला सुरुवात होईल: कार्यकर्त्यांनी वेळेवर जमा होण्याचे आवाहन..

     बेळगांव: लोकहित न्यूज

           राज्यात सद्या चर्चेच्या विषय ठरलेल्या धर्मस्थळ मृतदेह प्रकरण राजकीय हेतूनेच होत असून, त्याचा काय तो तत्काळ सोक्षमोक्ष लावावा या मागणीसाठी बेळगांव आणि खानापूर बेळगांव येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून भाजपतर्फे पदयात्रा काढण्यात येईल त्यानंतर आज सकाळी 10.30 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. परवाच भाजप प्रदेशाध्यक्ष विजेंद्र यांनी धर्मस्थळ प्रकरणी घतनस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले, राज्य सरकारने राजकारण करत या प्रसिद्ध स्थळाची बदनामी चालविली आहे का? असा प्रश्न विचारत तत्काळ या प्रकरणाचा उलगडा करा आणि बदनामी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र आंदोलने मोर्चा काढण्यात येत आहेत. बेळगावमध्येही आज भव्य मोर्चा निघणार आहे तरी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थीत रहावे अशी, सूचना बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केली आहे. ..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *