जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्याकडून खानापूर पोलिसांना शाबासकीची थाप…
खानापूर :: लोकहित न्यूज
खानापूर शहरात दोन ठिकाणी झालेल्या दागिणे चोरी प्रकरणातील दोन्हीं आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरी केलेले सोने -चांदी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. खानापूर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईची जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दखल घेऊन शाबासकीची थाप दिली आहे.
प्रकरण नंबर एक –
दिवस 21 एप्रिल रोजी खानापूर शहरातील मराठा मंडळ जवळील रेखा तुकाराम क्षीरसागर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील 60.5 ग्रॅम सोने लांबवले होते.
प्रकरण नंबर दोन –
शिवाजीनगर येथे 7 ते 9 जूनच्या दरम्यान 26 तोळे सोने 210 ग्रॅम चांदी चोरीचे प्रकरण घडले होते.
…आरोपी कोण? कुठले? ..
वरील दोन्हीं प्रकरणांचा छडा खानापूर पोलिसांनी लावला असून, दोन्हीं आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिपक रोहन मतांगी, रा. हलकर्णी , ता. खानापूर, व शिवनागण्या मुटीया उगमचीमठ रा. रोन, जि. गदग अशी दोन्हीं आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणासाठी पोलिसांचे एक पथक स्थापन करण्यात आले होते. जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख श्रुती एन. एस. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रामगोंड बसरगोंड, डीएसपी विरेय्या हिरेमठ, पीआय गवंडी, पीएसआय बिरादार , हवालदार, जी. आय. काद्रोळी, एम. व्हीं. कमकेरी यांचा या पथकात समावेश होता.







Leave a Reply