आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून  देवलत्ती, पारीशस्वाड पूर्व भागात धार्मिक, नागरी विकास कामांचा धूमधडाका….


देवलत्ती, पारीश्र्वड येथे आ. हलगेकर यांचा सत्कार; शाळा खोल्या, श्री यल्लमा देवी मंदीर स्लॅब पूजा, धर्मस्थळ योजना कार्यक्रमात हजेरी..

   

देवलत्ती : लोकहित न्यूज

         एकीकडे पंचहमी योजनेमुळे राज्यात विकास कामांना खीळ बसल्याची चर्चा सुरू असतानाही आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुक्यात विकासकामांचा सपाटा लावला आहे. त्यांचा खानापूर तालुक्याचा पूर्व भागात दौरा असून, त्याठिकाणी त्यांनी धार्मिक आणि नागरी विकासात्मक पाऊल टाकले आहे. त्याचाच एक आढावा…

     

देवलत्ती….

देवलत्ती याठिकाणी श्री यल्लमा देवीच्या भव्य मंदिराच्या स्लॅबचे पूजन करून पुढील कामाला चालना दिली. या ठिकाणीं उच्च प्राथमिक कन्नड शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी ‘आमची शाळा आमची संपती ‘ या योजनेतून बांधण्यात आलेल्या पाच वर्गखोल्यांचे आ. हलगेकर यांच्याहस्ते उद्घघाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी सरकारी शाळा समृध्द झाल्या पाहिजेत, त्यासाठी आमच्याकडुन लागणारे सहकार्य वेळोवेळी मिळेल असे सांगितले. हा कार्यक्रम माठाधिश चन्नबसव देवरू व माठाधिश शिवानंद महास्वामी यांच्या सानिध्यात झाला. कार्यक्रमाच्या शाळा सुधारणा समिती अध्यक्ष  जयवंत निडगलकर यांनी अध्यक्षस्थानी होते. नागेंद्र चौगुला यांनी स्वागत केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत उपाध्यक्षा मंजुळा निडगलकर, निवृत्त प्राचार्य  जी.के. होसुर, निवृत्त शिक्षक बसावंनगौदा पाटील यांनी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेसाठी जागा दान केलेल्या प्रदीप गौडा पाटील, विठ्ठल बनोशी, राजशेखर कामार, राजू खातेदार, विठ्ठल हिंडलकर, दशरथ बानोशी, सदाशिव मरडी, शाळा सुधारणा समिती, ग्राम पंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते. बसवराज तळवार यांनी कार्यक्रमाची माहिती दिली तर चन्नाप्पा कोलकार यांनी आभार मानले.

पारीश्वाड ; – नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन  द्या: आमदार….

      पारीश्वाड गाव आणि परीसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करताना आ. विठ्ठल हलगेकर यांनी केंद्राच्या मनरेगा योजनेमार्फत नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्या अशी सूचना पंचायतीला केली. यावेळी आमदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. याठिकाणी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्प यांनी आयोजित केलेल्या दारूबंदी शिबिराचे यावेळी आमदारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी तालुका नेते राजु सिध्दांनी, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील व गावकरी उपस्थित होते.

    

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *