,

आमटेला जादा बस फेऱ्या वाढवा; नागरीकांचे मॅनेजरना निवेदन


शाळकरी मुलांची गैरसोय; खानापूरातून सकाळीं 7 वा. , सायंकाळीं साडेपाचला बसची गरज..

खानापूर : लोकहित न्यूज

        आमटेहून खानापुरला कॉलेजला जाण्यासाठी सकाळीं 8 वाजता तर खानापुरातून  आमटेकडे येण्यासाठी सायंकाळीं साडेपाचला एक फेरी अशा दोन बस फेऱ्या वाढवण्यात याव्यात या मागणीसाठी आमटे ग्रामस्थ व ग्राम पंचायतीच्यावतीने तालुका बस डेपो मॅनेजरना निवेदन सादर करण्यात आले.

         सदर निवेदनात, आमटेसह जांबोटी, ओलमणी, कालमणी गावचे मिळून 60 विद्यार्थी दररोज सकाळी 8 वाजता आमटेहून खानापूरकडे निघतात, त्यांना यावेळेत बस फेरी नसल्याने कॉलेजचे पहिले तास चुकत असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. तर सायंकाळीं परत आमटेकडे येण्यासाठी 5 च्या दरम्यान बस फेरी नसल्याने अडचण येत आहे. त्याआधी आमटेला जाणारी सव्वा चारची बस लवकरच जात असल्याने त्यानंतर जांबोटीकडे जाण्यासाठी कोणतीच वाहतूक व्यवस्था नाहीं, त्यामुळें सायंकाळीं साडेपाचला एक फेरी तत्काळ सोडण्याची व्यवस्था करावी, शिवाय आधीच्या बस फेऱ्याही वेळेत सोडण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. गावकरी व ग्राम पंचायत आमटे यांच्यावतीने तालुका भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण गुरव, ग्राम पंचायत सदस्य मारुती गांवकर, ज्येष्ठ नागरिक महादेव गावकर, सुरेश केरकर, रामा गांवकर, भाजप नेते नामदेव केरकर, कल्लाप्पा गांवकर, विठ्ठल अडकुरकर आदी गावकरी व महिलावर्ग उपस्थित होते. यावेळी बोलतांना, पंडित ओगले यांनी बस डेपो मॅनेजरना तत्काळ दोन्हीं बसफेऱ्या सोडण्यात याव्यात अशी मागणी केली. यावर सहाय्यक बस डेपो मॅनेजरानी मुख्य मॅनेजरना या समस्येची माहिती देवू असे सांगताना, नवीन बस सोडणे शक्य होते की, नाही याची माहिती घेवून निर्णय घेण्यात येईल. सद्या सुरू असलेल्या बस फेऱ्यामध्ये वेळेत आदला- बदल करणे शक्य होते काय याची चाचपणी करू असे सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *