आ. विठ्ठल हलगेकर यांची स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर ग्वाही..
हब्बनहट्टी: लोकहित न्यूज नेटवर्क
तालुक्यात 61 गावचे रस्ते खराब झाले असून, त्यातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती तसेच अति खराब रस्त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न करण्यात येतील. टप्पा टप्प्याने ही कामे करण्यात येतील, अशी हमी आ.विठ्ठल हकगेकर यांनी दिली.
हब्बनहट्टी (ता. खानापूर) येथील श्री स्वयंभू मारुती तीर्थतीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या नाटक निमित आयोजित केलेल्या ते सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर होते. कमिटीचे सदस्य सुनिल चिगुळकर यांनी स्वागत केले.
व्यासपीठावर दुर्गादेवी देवस्थानचे माठाधिश मंजुनाथ ( अरुण) कणगुटकर महाराज, कर्नाटक विभाग शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील, पीएलडी बँकेचे अध्यक्ष व समिती नेते मुरलीधर पाटील ,संचालक शंकर सडेकर , कृष्णकांत बिर्जे, कमिटी सदस्य पुंडलिक पाटील, गणपती सावंत, नानू गावडे, नेताजी घाडी, सखाराम धूरी,भरमानी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक नगेश गावडे यांनी आभार मानले.
Leave a Reply