खानापुरात कामगार खात्याच्यावतीने कामगारांना किटचे आमदारांच्याहस्ते वाटप; ईओ, कामगार खात्याचे अधिकारी, मल्लाप्पा मारीहाळ यांची उपस्थिती…

खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
परमेश्वराने जगातील माणसांना वेगवेगळे घडवले असल्याने त्याच पद्धतीची प्रत्येकामध्ये कला दडली आहे, त्याचा त्यांनी आपल्या पोटपाण्यासाठी वापर करतात आणि सर्वांनी केला पाहिजे. नुसतेच सरकारी योजना, सबसिडी, मानधन मिळेल म्हणून कोणी त्यावर अवलंबून राहू नये, आज सरकार वेगवेगळ्या योजना देते आहे, पण ते कोणाचे पैसे जनतेचेच आहेत, त्यामुळे तुम्हीं तुमचे स्वराज्य बनवा, सरकारच्या मदतीची वाट पाहण्याची वेळच येणार नाही. त्याला आज याठिकाणी उपस्थीत असलेले विविध प्रकारच्या कामाच्या कामगारांच्या कलेचा आज याठिकाणी सन्मान अर्थात आदर होत आहे, असे मत तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. तालुका पंचायत आवारात कामगार खात्याच्यावतीने कामगारांना किटचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ईओ रमेश मेत्री, कामगार खात्याच्या अधिकारी दीपा बंडी, तालुका भाजप सचिव मल्लापा मारिहाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना, आमदार हलगेकर म्हणाले की, प्रत्येकाने आपल्यातील केलेनुसार काम करावे तरच तुम्हीं स्वावलंबी बनाल. स्वतःला येत असलेले काम करण्यास कोणीही कमीपणा मानू नये, तुमच्या कलेला तुम्हीं का? कमीपणा मानता असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी नारायण गुरव, सुनील मंडीमणी, श्रीकांत इटगी आदी मान्यवर उपस्थित होते.






Leave a Reply