खानापुरात पंचहमी योजनेच्यावतीने शिवस्मारकामध्ये महिलादिन; अधिकारी ,मान्यवरांची उपस्थिती…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
नारी शक्ती म्हणजेच सर्वस्व अन् नारीशक्ती म्हणजेच तालुक्याचा आवाज असे मत तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी मांडले. खानापूर शिवस्मारकमध्ये पंचहमी योजनेच्यावतीने महिलादिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. व्यासपिठावर पंचहमी योजनेचे सचिव तथा खानापूर तालुका पंचायत ईओ रमेश मेत्री, तालुका बालकल्याण अधिकारी विक्रम के. बी, वैष्णवी पाटील, अनिता दंडगल, गीता अंबरगट्टी, प्रियांका गावकर व हमी योजनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना, सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, तालुक्यात पंचहमी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू असून, गृहलक्ष्मी योजनेमुळे आतापर्यंत 27 हप्ते जमा झाले आहेत, त्यामुळे प्रत्येक महिलेच्या खात्यात 54 हजार रुपये असे एकूण 350 कोटींची आर्थिक मदत तालुक्यातील महिलांना मिळाली आहे. नारीशक्ती योजनेतून 53 कोटी 91 लाखांचा निधी मिळाला आहे, तालुक्यात युवा शक्ती योजनेचा 1800 युवकांना लाभ मिळाला आहे. तालुक्यातील अन्नभाग्य योजना भ्रष्टाचारमुक्त झाली असून, रेशन वाटप प्रामाणिकपणे होत असल्याचे सर्व नागरिकांना त्याचा योग्यरितीने लाभ होत आहे, अशा या लोकप्रिय योजनांचा प्रचार करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. यावेळी तालुका महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा सावित्री मादार यांनीही आपले सुंदर असे विचार मांडले.

गृहलक्ष्मीतून मिळालेल्या निधीचा योग्य तो व्यावसायिक, सांसारिक उपयोग करणाऱ्या महिलांचा सत्कार…
सरकारकडूच्या गृहलक्ष्मी योजनेतून मिळालेल्या निधीचा योग्य तो सांसारिक व व्यावसायिक उपयोग करून समाजात वेगळा आदर्श घडवून दाखवणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. मागी पिंटो, देवक्का हतरवाड, दिशा दीपक कवठणकर, मलप्रभा कमार, अंजली ठोंबरे, पार्वती नाईक, लक्ष्मी मेणशे , गीता मादार, शरिया परस, दिपाश्री पाटील, तुळसा गुरव, रुक्मिणी भेकणे, पूजा उपसकर, रेखा कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.






Leave a Reply