योजनेनुसार काम होत नसेल तर 14 कोटींचा रस्ता उखडून टाकूया का? : आ. विठ्ठल हलगेकर


तालुका पंचायत सभागृहात सर्वपक्षीय बैठकीत सर्वच संभ्रम, समस्यांबाबत दिले प्रत्युत्तर; तात्काळ रुमेवाडीकडील रस्ता माती टाकून वाहतूक व्यवस्था करणार….

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       स्थानिक ग्राम पंचायत ते नगरपंचायत, तहसीलदारसह अशा या स्थानिक पातळीपासून ते तालुकास्तरीय समस्यांसाठी माझेच नांव पुढे करून तालुक्यात राजकारणाच्या आडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्राम पंचायतीला पिडीओ असतो तर सर्वच खात्यांमध्ये तालुका व स्थानिक अधिकारी असतांनाही जाणूनबुजून माझेच नांव घेतले जात आहे, त्या खात्याचे अधिकारी असतांना या सर्व समस्यांबाबत मीच कसा? जबाबदार, रस्त्यांसह विकास कामे ठरल्याप्रमाणे होत नसतील तर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारा प्रत्येक बाबतीत माझेच नाव घेणं कितपत योग्य आहे, खानापूर शहराच्या बाबतीत गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेचा विषय बनलेल्या रुमेवाडी ते मराठा मंडळ ( राजा स्टाईल) पर्यंतच्या 14 कोटींच्या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाबद्दल कुणाला संभ्रम असेल तो रस्ता अभियंत्यांना दाखवून उखडून टाकूया का? मी त्यालाही तयार आहे असे सांगत, अशा अनेक समस्या, विकास कामांबद्दल नागरिकात असलेल्या संभ्रमाबद्दल आमदार विठ्ठल हलगेकर यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले. यासाठी तालुका पंचायतीच्या सभागृहामध्ये झालेल्या अधिकारी आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. बाजूला तालुका पंचायत ईओ रमेश मेत्री व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

रुमेवाडीकडील रस्ता माती टाकून तात्काळ वाहतूक समस्या दूर करणार: आमदार…

      गेल्या दोन महिन्यांपासून रुमेवाडीकडे जाणारा रस्ता रस्त्याच्या कामामुळे बंद असल्याने वैतागलेल्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत, परिणामी हा रस्ता बंद असल्यामुळे बससह सर्वच बाबतीत समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा परिणाम व्यापारावरही झाला आहे.. त्यामुळे नवीन रस्त्याच्या कामाचे बघू नंतर आधी आजच्या आज सदर रस्त्यावर माती टाकून वाहतूकीसाठी रस्ता खुला करून देऊया असे सांगतानाच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उपस्थित अधिकारी आणि सर्वपक्षीय नेत्यांची संमती घेऊन हा निर्णय घेतला. त्याला सर्वांनी होकारही दिला.

तीन महिन्यांपासून चर्चा जोरात; खरा नाटक अजून बाकी….

       तालुक्यातील पंचायतीपासून ते तहसीलपर्यंतच्या सर्वच बाबतीत त्यात आमदारच आहे, त्यांनीच ही या समस्या सोडविल्या पाहिजेत असे सांगून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध सुरू आहे. खऱ्या अर्थाने आता कुठे तरी शहरात विकास होत आहे, 14 कोटींच्या रस्त्यासाठी मी अधिवेशनात असतानाच आम्हालाच कंत्राट द्या म्हणून दोघां तिघांचे फोन आले. परंतु, जो कंत्राटदात सध्या काम करतो आहे, त्यांच्या माध्यमातून जादा 10 कोटींचा निधी मिळाला आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत. 14 कोटींच्या रस्त्याबाबत भांडण हे कंत्राट मिळण्यासाठी? … त्या रस्त्याचे काम योजनेनुसारच चालले आहे. राज्यातील भाजप आमदारांमध्ये मला एकट्यालाच जादा 10 कोटींचा निधी मिळाला आहे तोही त्या कंत्राटदारांमुळे मिळाला असा खुलासा आमदारांनी यावेळी केला.

मयेकर नगर, मारुती नगरसह लगतच्या परिसरासाठी 3 कोटींचा निधी खर्च….

       शहरात विकास सुरू असताना काहीच नाही असे भासवले जात आहे, शहरात मयेकर नगर, मारुती नगरसह लगतच्या परिसरासाठी 3 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातून काँक्रेट रस्त्यांचे काम झाले आहे. असे असताना राजकारण का आणि कोण करते आहे.

जिथे जखम आहे तिथेच मलम लावायला पाहिजेत…..

   कोणत्याही समस्येच्या मुळाशी न जाताच त्याबद्दल संभ्रम निर्माण करत त्या अधून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्हीं राजकारण अवश्य करा पण, परिस्थिती बघून करा असाही सल्ला आमदारांनी दिला.

सदर 38 गळ्यांची निविदा ( टेंडर) काढणार ; आमदारांची घोषणा…

राजा शिव छत्रपती स्मारकाला लागून ते पुढेपर्यंत असलेल्या 38 गळ्यांची निविदा (टेंडर) काढून ते वाटप करण्याची घोषणा यावेळी आमदार हलगेकर यांनी केली. त्यामध्ये मागासवर्गीयांसाठी अंदाजे 5 गाळे नियमानुसार राखीव ठेवण्यात येतील असेही त्यांना सर्वांसमोर घोषित केले. त्यासाठी कोणीही टेंडर भरू शकता, गाळे घेणारे शहरातीलच आहेत, त्यांना साथ द्या, टेंडरची जाहिरात मराठी आणि कन्नड दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रतिक्रिया

    विनाकारण जनतेत संभ्रम निर्माण करत, त्या आडून कोणी राजकारण करत असेल तर जरूर करावे पण, त्याआधी जरा पारख करावी. तसा प्रत्येकाला अधिकार आहे..

विठ्ठल हलगेकर, आमदार…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *