
नुकतीच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षेतखाली अक्रम सक्रम कमिटीची बैठक पार पडली…
खानापूर; लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
पूर्वीपासून सरकारी पड आणि वनखाते अखत्यारीत शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या खानापूर तालुक्यातील जमिनींचा प्रश्न मोठा असला तरी, सध्याच्या अक्रम -सक्रम कमिटीने याची गांभर्याने दखल घेतली असून, शासकीय नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ जमिनी वाटप करण्याचे काम हती घेतले आहे. दोन दिवसापूर्वी खानापूर तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या अक्रम- सक्रम कमिटीच्या बैठकीत बहुतेक जमिनींचे वाटप करण्यात आल्याची माहिती, अक्रम सक्रम कमिटी सदस्य दिशा दीपक कवठणकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षेतखाली ही बैठक पार पडली. तहसीलदार दुंडापा कोमार तसेच संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार हलगेकर यांनी लाभार्थी शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून सरकारी फाळापट्टी भरत जमिनी राखून ठेवल्या आहेत, त्यावर त्यांची आशा राहणारच, त्यामुळे त्यांना त्याचा हक्क मिळालाच पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी अक्रम सक्रम सदस्य अँड. राजू नाईक, भिमशी राजप्पनावर आदी मान्यवर उपस्थित होते..






Leave a Reply