भक्तीभाव हा व्यक्तीचा आत्मा आहे; आ. विठ्ठल हलगेकर


शिवठाणमध्ये श्री कलमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती…

  

शिवठाण:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      गावात मंदिरे ही गावचे वैभव असून, त्यांचे जतन करणे, मनोभावे त्यांना पूजने हेच आमचे कर्तव्य आहे. भक्तिभाव हा व्यक्तीचा आत्मा आहे, असे सांगतानाच मंदिरामुळे गावात एकोपा टिकून राहतो असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. शिवठाण ( ता. खानापूर) येथे श्री कलमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आमदार बोलत होते. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई गावातील आजी माजी मान्यवर व आमंत्रित पाहुणे उपस्थित होते.

शिवठाण येथील श्री कलमेश्वर मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमात बोलतांना आमदार विठ्ठल हलगेकर..

     सुरवातीला आमदारांनी श्री कलमेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटी आणि गावकऱ्यांनी आमदारांचे स्वागत केले. यावेळी पुढे बोलतांना आमदारांनी धार्मिक विषयाबरोबर सामाजिक आणि विकासात्मक विषयांवरही बोट ठेवले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next :