,

केडीपी मीटिंग; आमदारांकडून तालुका अधिकारी ‘धारेवर’


वाळूसह तालुक्यातील मूलभूत समस्यांबाबत आमदारांनी विचारला जाब; हत्तींसह जंगली प्राण्याच्या समस्येसह विविध विषयांवर चर्चा…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

    आधीच खानापूर तालुका जंगलप्रदेशाने व्यापलेला आहे, त्यामुळे वाळू, वीट व्यवसाय येथील भूमिपुत्रांच्या पोटापाण्याचा आधार आहे. अलीकडे तालुक्यात वाळू बंदीमुळे सामान्य जनता पुरती हतबल झाली आहे, असे असताना अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे त्यात अधिकच भर पडत असून, त्याचे कारण काय? तुम्हीं काय करत आहात, येथील गोरगरीब जनतेने आपला उदरनिर्वाह कसा करावा असे अनेक प्रश्न विचारत, आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावर अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली होती. गुरुवारी तालुका पंचायत बैठक हॉलमध्ये केडीपी मीटिंग पार पडली. त्यावेळी अध्यक्षपदावरून आमदार बोलत होते. व्यासपिठावर तहसीलदार दुंडप्पा कोमार, तालुका पंचायत प्रभारी अधिकारी रमेश मेत्री, तालुका आरोग्य अधिकारी महेश कीडनावर, बांधकाम खात्याचे अधिकारी संजय गस्ती, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

आमदारांनी कोणकोणते मुद्दे उपस्थित केले…

         वाळू बंदीमुळे वीट व्यावसायिकही अडचणीत…

तालुक्यातील वाळू बंदीमुळे वीट व्यावसायिकही अडचणीत आला आहे, त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालायचा कसा? गेल्या तीन वर्षापासून वाळू बंद चालू खेळांमध्ये सामान्य नागरिक अडचणीत आला आहे, त्याचे उत्तर द्या.

हत्तींसह जंगली प्राण्यांचा उच्छाद शेतकऱ्यांच्या मुळावर ..

      नीलावडेसह तालुक्याच्या अनेक भागात हत्तींसह जंगली प्राण्यांनी उच्छाद मांडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, त्यावर उपाय काढण्यास अधिकारी अपयशी ठरले आहेत. याचे उत्तर द्यावे.

तहसीलदार कार्यालयातील सावळा गोंधळ थांबता थांबेना; सामान्य नागरिकांना त्रास दिलात तर गय नाही….

      खानापूर तहसीलदार कार्यालय म्हणजे घोटाळ्यांचे ऑफिस अशीच ओळख निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांची येथील अधिकारी वेळेत कामे करत नाहीत. पैशांसाठी अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिला जातो. हे असले प्रकार तात्काळ बंद झाले पाहिजेत. नाहीतर ‘कारवाईला सामोरे जा’ असा सज्जड दम आमदारांनी यावेळी भरला.

केडीपी मीटिंगला उपस्थित अधिकारी..

रेशन कार्डची समस्या नागरिकांना त्रासदायक; ही समस्या लवकरात लवकर सोडवा…

     गृहलक्ष्मी योजनेमुळे नवीन रेशन कार्ड वितरणाची प्रक्रिया बंद चालू असा खेळ चालला आहे, तो थांबला पाहिजे. रेशन कार्डमुळे सामान्य नागरिकांची सरकारी कामे थांबत आहेत, शिवाय गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळेनासा झाला आहे. ही समस्या तत्काळ दूर करा अशी सूचना आमदारांनी यावेळी दिली.

      

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *