सध्याच्या पिडीओंना याबाबत काहीच माहिती नाही; एसीएसटी समाजाच्या विकासाबाबत जांबोटीवाड्यातील समाजबांधवांनी उठविला होता आवाज….
जांबोटी लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जांबोटी पंचायत क्षेत्रातील राजवाडा येथील एसीएसटी समाजाच्या विकासाबाबत जांबोटीवाड्यातील समाजबांधवांनी आवाज उठवून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन, तक्रारी दिल्या होत्या. याची चौकशी लागणार तेवढ्यात तत्कालीन पीडीओ प्रकाश कुडची यांनी टेबल, खुर्च्या, तिजोरी अशा वस्तू नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी दिल्याची माहिती ‘लोकहित न्यूज’ च्या हाती लागली आहे. याबाबत लोकहित न्यूज ने आवाज उठवला असून, तालुका पंचायतीकडून याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
खुर्च्या टेबल तिजोरी या वस्तू आल्या कुठून? कोणत्या फंडातून….?
जांबोटी राजवाड्यातील एसीएसटी ( मागासवर्गीय) वस्तीत विकासकाने केल्याचे दाखवून लाखोंचा सरकार निधी लाटल्याचा आरोप करत, त्याबाबत काही पुरावेही आंदोलकांनी दिले होते. लागलीच वरिष्ठ अधिकारी याची चौकशी करणार तेवढ्यातच स्वतः पिडीओ प्रकाश कुडची यांनी जांबोटीत येऊन आंदोलकांनी मनधरणी करत पुन्हा न झालेली कामे करून देण्याची हमी दिली होती. मात्र, त्यानंतर काहीच न झाल्याचे लक्षात येताच खुर्च्या, टेबल, तिजोरी या वस्तू आंदोलकांच्या समाधानासाठी प्रकाश कुडची यांनीच दिल्याचे उघड झाले आहे. मात्र, तरीही त्या वस्तू नाकारल्याने ते सर्व साहित्य पंचायतीतच जागा अडवून आहे… याची चौकशी होणार असल्याची माहिती तालुका पंचायतीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली..
कोणत्या फंडातून खुर्च्या, टेबल, तिजोरी या वस्तू आल्या याची पंचायतीत नाही नोंद….
खुर्च्या,टेबल, तिजोरी या वस्तू ग्राम पंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर पडून आहेत, त्या वस्तू कोणत्या फंडातून आणण्यात आल्या याची मात्र, पंचायती दप्तरात नोंद नाही. याबाबत सध्याच्या पिडीओ दीपा यांना याबाबत विचारले असता, यातील काहीच माहिती नसल्याचे त्यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले. शिवाय सेक्रेटरी नारायण पाटील यांच्याकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनीही आपणाला याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. या वस्तूंचा ग्राम पंचायतीला कोणताच संबंध नसेल तर त्या वस्तू पंचायत कार्यालयात का? पडून आहेत… जागा आडव्यासाठी? सरकारी कार्यालयात वैयक्तिक साहित्य कसे ठेवता येते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत…

सरकारी फंडातील खुर्च्या टेबल साहित्य नसेल तर मग… प्रकाश कुडची यांनी स्वतः दिले का?… कशासाठी? डाळ में कुछ तो काला है!
सदर खुर्च्या,टेबल,तिजोरी सरकारी फंडातून आणण्यात आल्या नाहीत असे यावरून स्पष्ट होत आहे. तर या वस्तू आल्या कुठून? कोणी आणि का आणल्या?? याचीच चर्चा सुरू आहे. तर मग पिडीओ प्रकाश कुडची यांनी स्वतः त्या वस्तू दिल्याचे स्पष्ट होते. त्यांनी का? दिल्या. यावरून डाळ में कुछ तो काला है! असे स्पष्ट होत आहे..
प्रतिक्रिया –
या खुर्च्या,टेबल, तिजोरी कुठून आल्या याची मला काहीच कल्पना नाही. त्या कोणत्या फंडातून आणण्यात आल्या याची आमच्याकडे नोंद नाही…
– पिडीओ दीपा, सध्याच्या पिडीओ जांबोटी पंचायत…






Leave a Reply