जांबोटी पंचायतीचा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ? बाजारपेठ अंगणवाडीसमोर तुंबलेल्या गटारींमुळे आरोग्य धोक्यात…

0
Screenshot_20260120_115408.jpg

15 आयोगातील निधी गेला कुठे? नागरिकांचा प्रश्न, पीडिओ आहेत का?

जांबोटी लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

        

  एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार स्वच्छतेचा नारा देत असताना दुसरीकडे गावपातळीवर स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे, पश्चिम भागाचे केंद्र असलेल्या जांबोटी ग्राम पंचायतीची स्वच्छता वाऱ्यावर पडली आहे. जांबोटी पेठतील अंगणवाडीसमोर गटारी तुंबल्या असून, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी लहान बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असतांना ग्राम पंचायतीची डोळेझाक झाली आहे. त्यामुळे पंचायतीच्या 15 वा आयोग योजनेतील निधी गेला कुठे? असा सवाल सामान्य नागरिकांतून केला जात आहे.

गावात ठिकठिकाणी तुंबलेल्या गटारी, झाडी झुडुपांनी व्यापले…

    जांबोटीवाडा आणि पेठेतही ठिकठिकाणी घाण पाण्याने गटारी तुंबल्या असून, काहीं ठिकाणी झाडी झुडुपांनी व्यापलेले आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने यावर्षी स्वच्छता केली की, नाही! केली असेल तर कुठे केली शिवाय त्यासाठी किती निधी खर्च केला याचा खुलासा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

पंचायतीसाठी लाख 50 हजाराचा निधी 15 आयोगमधून ठेवला होता…..

    पंचायत क्षेत्रातील सर्व गावातील स्वच्छतेसाठी दोन हजार 50 हजाराचा निधी 15 आयोग योजनेत राखीव ठेवण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक गावासाठी 50 हजार निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती सचिव नारायण पाटील यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. परंतु, त्यानुसार स्वच्छता झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया

    मी अंगणवाडीसह गावात पाहणी केली असून, अनेक ठिकाणी स्वच्छता करायची आहे, लवकरच पुन्हा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येईल अशी माहिती पीडीओ दीपा यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

अंगणवाडी समोर तुंबलेल्या गटारींमुळे बालकांचे आरोग्य घोक्यात आले आहे, परिणामी घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे, काय करते पंचायत?..

मारूती हळब, युवा सामाजिक कार्यकर्ते जांबोटी..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed