रोहित पाटील,वैभव गावडे यांची बीएसएफमध्ये भरती; कुसमळी गावात एक जल्लोष!


अथक परिश्रम घेऊन अखेर शेवटच्या भरतीत झाली निवड ; सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांच्याकडून विशेष सत्कार

 

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

    भारतीय सेनेच्या कोणत्याही विभागात भरती होणे म्हणजे विशेषकरून ग्राम भागासाठी आजही मोठ्या अभिमानाची गोष्ट मानली जाते. पूर्वी हे चित्र उलट असले तरी त्यात अलीकडच्या काळात खूप बदल झाला आहे. असाच पराक्रम कुसमळी ( ता. खानापूर) येथील दोन जिद्दी युवकांनी करून दाखवला आहे, वैभव गावडे आणि रोहित पाटील अशी या युवकांची नावे असून, हे दोघेही भारतीय सेनेच्या बीएसएफ (पोलिस) मध्ये भरती झाले अन् गावात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत व गावकऱ्यांच्यावतीने दोन्हीं योद्यांचे गावात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

शेवटच्या संधीचे केले सोने; अन् अखेर बाजी मारलीच…

     आज कोणत्याही कामात सातत्य, परिश्रम आणि अथक प्रयत्नांमुळे यशाकडे नक्कीच पोहचता येते. त्यासाठी मोठी जिद्दही उरी बाळगावी लागते. याच मार्गाचा अवलंब करत या दोन्हीं युवकांचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. ही शेवटची भरती होती, त्यामुळे यामध्ये यश मिळवणारच अशी जिद्द रोहित आणि वैभवी या दोघांनीही मनात बाळगून अखेर बाजी मारलीच. त्यामुळे कुसमळी गावच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, याबद्दल गाव आणि जांबोटी भागातूनच या दोघांचेही अभिनंदन केले जात आहे. ‘लोकहित न्यूजतर्फे दोन्हीं युवकांच्या कामगिरीला सलाम’

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *