बेळगांव आणि खानापूर प्रत्येकी दोन दोन बस फेऱ्या धावणार; गावकऱ्यातून समाधान…
भूरणकी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
बिडी आणि कक्केरी भागात महत्वाचे गावं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूरनकी ( ता. खानापूर) गावच्या विकासात दिवसेंदिवस भर पडत असून, या गावची महत्वाची समस्या असलेल्या वाहतुकीचा प्रश्नही सुटला आहे. याआधी बेळगाव ते भुरनकी गावाला दोन बस फेऱ्या सुरू होत्या, त्यात आता भर पडली असून, खानापूर ते भूरनकी अशा दोन बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रामू दोडमणी व त्यांच्या पत्नी ग्राम पंचायत सदस्या मंजुळा दोडमणी यांच्या प्रयत्नातून, या गावचे सुपुत्र आणि माजी खानापूर तालुका सभापती महेश पाटील व ग्राम पंचायत सदस्य एम. एम साहूकार यांच्या मार्गदर्शाखाली बस वाहतुकीची समस्या सुटली आहे. खानापूरमधून सकाळी तर बेळगावमधून दुपार आणि सायंकाळी बस सेवा उपलब्ध असेल असे कळविण्यात आले आहे. खानापूर बसच्या पूजेवेळी माजी सभापती महेश पाटील, ग्राम पंचायत सदस्य एम एम साहूकार, रामू दोडमणी, नागेश गोसवाळ, निलेश पाटील, गोपाळ तरोडकर, लक्ष्मण एम, ग्राम पंचायत सदस्या मंजुळा दोडमणी, लक्ष्मण पाटील, इनामसाब सनदी, दयानंद पाटील, नागेंद्र पाटील, बाबुराव पाटील यांच्यासह गावकरी उपस्थित होते…






Leave a Reply