गुरुवारी रात्री 12हून अधिक हत्तींच्या कळपाने तोराळी, देवाचीहट्टी परिसरात मांडला उच्छाद..
देवाचीहट्टी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज )

तोराळीच्या दिशेने आलेल्या 12 हत्तींच्या कळपाने देवाचीहट्टीत (ता. खानापूर )रताळीच्या 35 पोत्यांचे विस्कटून नुकसान केले आहे. गावच्या वरच्या बाजुला वसंत बाबू धुरी यांनी आपल्या शेतामध्ये भरून ठेवलेल्या रताळी पोत्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. पोती विस्कटून टाकली असून, त्याची खावून, तुडवून नुकसान केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. एकूण 35 पोती भरून ठेवली होती, ती पाडून खाण्याच्या नादात नुकसानच अधिक प्रमाणात हातींकडून झाले आहे. वनखात्याने या घटनेचा पंचनामा करून तत्काळ भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे. तसेच लगतच असलेल्या संजय नारायण धुरी यांच्याही रताळी पोत्यांचे हातींकडून नुकसान झाले असून, त्याची पाहणी वनखात्याने करावी अशी जोर धरू लागली आहे.
हत्तींच्या कळपाची बैलूरच्या दिशेने कूच…
तोराळी, देवाचाहट्टीत नुकसान केल्यानंतर हत्तींच्या कळपाने बैलुरच्या दिशेने पलायन केले आहे, ते तिकडे जातात की, पुन्हा फिरुन परतीच्या वाटेवर येतात याचा नेम नाही. त्यामुळे एकंदरीत बैलूर,देवाचीहट्टी , तोराळी भागात आणखी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होण्यात हे मात्र, नक्कीच. वनखात्याने या कळपाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची गरज आहे…






Leave a Reply