गावच्या गावडे, गुरवांची दादागिरी का? देवाचीहट्टीतही असाच प्रकार….


दारोळीत दोघांवर बहिष्काराचा प्रकार: तहसिलदार मंजुळा नाईक आज दारोळीत; गावच्या देवस्कीची कामे करतात म्हणजे हे लोक राजे का? यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज…

जांबोटी: लोकहित न्यूज…( विलास कवठणकर)

       प्रत्येक  गावाने तुम्हीं देवस्कीची कामे करा म्हणून जबाबदारी दिली म्हणजे आम्हीच गावचे राजे समजायचे का? असाच प्रकार अलीकडे दारोळी (ता खानापूर) गावात भावकु मुतगेकर यांच्या कुटुंबाबाबत घडला आहे, येथील दोन गुरवांनी या कुटुंबावर दादागिरी चालविली असून, सार्वजनिक उत्सव, देवस्कीच्या कामात जाणीवपूर्वक बहिष्काराचा प्रकार चालवला आहे, त्यामुळे मुतगेकर कुटुंबाने खानापूर तहसीलदार आणि पोलिसात तक्रार केली आहे . त्यांचा पंचनामा करण्यासाठी नूतन तहसीलदार मंजुळा नाईक आणि सीपीआय गवंडी यांनी दारोळीत येणार येत आहेत. याबाबत तहसीलदार नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रस्त्याचा कामातून हा वाद असून, तो मिटवण्यासाठी मी जात आहे असे त्यांनी’ लोकहित न्यूज’ शी बोलतांना दिली.

….दारोळीतील काय आहे हा प्रकार….?

      दारोळीत गेल्या गणपती उत्सवापासून भावकांना मुतगेकर यांच्याबाबत विलास चांगप्पा गुरव आणि सचिन गोविंद देसाई ( रा. दारोळी,ता. खानापूर ) या दोघांकडून सार्वजनिक उत्सवामध्ये जाणिवपूर्वक मज्जाव केला जात आहे, अशी तक्रार मुतगेकर यांनी तहसीलदार आणि पोलिसात दाखल केली आहे. त्यात देसाई आणि गुरव यांच्याकडून आमच्यावर दादागिरी केली जात असून, सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमात अडवले जात आहे.  वैयक्तिक कारणाचा राग सार्वजनिक क्षेत्रात काढला जातं आहे, असे नमूद करण्यात आले आहे. याचा सरकारने पाठपुरावा करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

       

   

देवाचीहट्टीतही असाच प्रकार; पुन्हा आवाज उठवणार….

      वैयक्तिक कारणाचा राग सार्वजनिक क्षेत्रात काढत (देवीचीहट्टी ता. खानापूर) येथेही घडला असून, याला तीन वर्षे उलटली तरी येथील हा प्रकार कमी होण्याचे नाव घेईना! याठिकाणीही दोघांना देवस्कीच्या कामात जाणीवपूर्वक बहिष्काराचा प्रकार सुरू आहे. याबाबत गावपातळीवर तसेच पोलिसांसमोर न्याय् निवडा झाला होता. तरीही येथील ‘गावडे ‘ सामाजिक सलोखा राखण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांच्याविरुद्ध पोलीस आणि तहसीलदारांनी कठोर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी, प्रदीप कवठणकर आणि विलास कवठणकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना केली. तसेच याबवाबत आम्हीं पोलीस, तहसीलदार आणि डीसींच्याकडे तक्रार करणार असल्याचेही कवठणकर यांनी सांगितले.

जांबोटी भागात काहीं गावात असे प्रकार जोरात; आता सरकारच देणार लक्ष….

     

     आम्हीं गावडे, आम्हीं गुरव असे म्हणत मीपणाचे प्रकार जांबोटी भागांतील देवाचीहट्टी, दारोळी गावात सुरू आहेत. शिवाय कणकुंबी जवळील चीगुळे गावातही याबाबत मागे वाद पेटला होता. असे प्रकार वाढीस गेल्यास गावचा सलोखा निघण्याची भीती आहे, त्यामुळे सरकारने याबाबत कठोर पाऊले उचलली पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तालुका नेत्यांनी समान न्याय द्यावा… उगाच आपला तो बाळ्या म्हणू नये…

     गावात असे प्रकार घडले तर लगेच तालुकास्तरीय नेते डोके वर काढतात आणि आरोपींची साथ देतात, आणि खरोखर ज्याच्यावर अन्याय झाला आहे, त्यांनाच अधिक त्रास देतात. असे प्रकार वाढीस लागते आहेत, तरी अशा नेत्यांनी विचार करुन समान न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रतिक्रीया –

    आमचा रस्त्याचा वाद फार दिवसाआधीच मिटला आहे, त्यानंतरही गणपती उत्सवापासून सर्वच सार्वजनिक बाबतीत या दोघांकडून मज्जाव केला जात आहे. याबाबत गावकऱ्यांनीही हा न्याय मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, हे लोक ऐकून घेत नाहीत. अतीच झाली म्हणून आम्हीं पोलीस आणि तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची मागणी आहे..

-भावकांना मुतगेकर, पीडित व्यक्ती दारोळी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *