नूतन तहसिलदार मंजुळा नाईक यांचे जांबोटी सोसायटी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्याकडून स्वागत…
खानापूर: लोकहित न्यूज
चार दिवसांपूर्वी खानापूरचे नूतन तहसिलदार म्हणून रूजू झालेल्या मंजुळा नाईक यांचे जांबोटी सोसायटीचे संस्थापक -अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तालुक्यात तहसीलदार कार्यालय हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, अशीच चर्चा सामान्य नागरिकात आहे. ती पुसून टाकण्यासाठी आपण उपयोजना कराव्यात, खानापूर तालुका हा लहान मोठ्या खेड्यांचा आहे, त्यामुळे या भागातून अति शांत आणि कायद्याचा सन्मान करणारी जनता आपल्या दारी येते. त्यांना योगय तो न्याय देण्यासाठी आपण उत्तम प्रशासन आणावे, अशी विनंती श्री. बेळगावकर तहसीलदारांकडे केली. यावेळी त्यांच्यासोबत जांबोटी सोसायटीचे संचालक भैरू पाटील यांनीही उपस्थित होते. यावर बोलतांना तहसीलदार मंजुळा नाईक यांनी नक्कीच सामान्यांना योग्य तो न्याय मिळेल अशी हमी दिली.






Leave a Reply