बसस्थानच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य; स्थानिकांसह संपूर्ण भागाला त्रास….
जांबोटी : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार जरी स्वच्छ्ता अभियानाची अंमलबजावणी आणि जागृती करत असले तरी स्थानिक पंचायती, स्वराज्य संस्था त्याचे पालन करते काय? हा चिंतनाचा विषय आहे. स्वच्छ्ता अभियानाअंतर्गत दरवर्षी लाखोंचा निधी स्थानिक ग्राम पंचायतीना येत असतो, तरीही जांबोटी भागाची केंद्र पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या जांबोटी बसस्थानकावरील स्वागत कमानीसमोरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे, येथून पंचायतीसह सर्वच आधिकारी , ग्राम पंचायत अध्यक्ष – सदस्य आणि आम्हीं नेते म्हणनाऱ्यांचे दररोज येणे जाणे असते. तरीही ही पाण्याची घाण यापैकी कोणाला दिसत नाही का? .. ती घाण म्हणजे आपले सौंदर्य आहे , असे या सर्वांना वाटते की काय? असा प्रश्न नाही पडला नाही तर नवलच! काय म्हणावे या कारभाराला, आता वरिष्ठ अधिकारी तरी याकडे लक्ष देणार का? असा सवाल सामान्य नागरिकांतून केला जात आहे.
.
…येथूनच उगम पावते बघा ही गटारगंगा.. याचा ग्राम पंचायत घेणार का? शोध…
जांबोटी बस स्थानकावर जांबोटी गावामध्ये आत जातांना श्री मंजुनाथ दुर्गा देवी स्वागत कमानी समोरच या गटारगंगेचा उगम होतो अन् त्याचा प्रसार एक पात्र कणकुंबीच्या दिशेला तर दुसरे बेळगावच्या दिशेने वाहते. त्यामुळे स्थानिकांसह बेळगांव, गोवा आणि भागातील खेड्यातून येणाऱ्यांना त्याचा चांगला सुगंध घेण्याचे भाग्य लाभते. जांबोटी पंचायत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल का? असा प्रश्न आहे.
प्रतिक्रिया –
खरोखरच ही घाण सर्वांनाठी डोकेदुखी ठरत आहे, तत्काळ ती स्वच्छ करण्यात येईल, शिवाय गावातीलही स्वच्छता राखणे आवश्यक आहे..
-मंजुनाथ मुतगी, ग्राम पंचायत सदस्य जांबोटीपेठ.







Leave a Reply