जांबोटीत हाफपीच क्रिकेट स्पर्धांना शुक्रवारपासून सुरवात..


पाहुण्यांच्या सभेचे आयोजन पडले पार; शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चालणार बॉल -बॅट यद्ध…

जांबोटी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)

     जांबोटी येथील अयोध्यानगर मंडळाच्यावतीने शुक्रवार दिनांक 14 ते रविवार  (दिनांक – 16 ) असे तीन दिवस हाफपीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन,  शुक्रवारी रात्री मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घघाटन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना पहिले बक्षिस 15001, दुसरे बक्षिस 8001  देण्यात येतील. तर अंतिम सामन्यासाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धा सर्कल स्तरावर असतील असेही कळविण्यात आले असून, सायंकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत या स्पर्धा चालतील असेही आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते…

     यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रिय हॉटेलचे मालक सुधाकर गावडे होते, व्यासपीठावर माजी ग्राम पंचायत अध्यक्ष महेश गुरव, दत्ता नाईक, ग्राम पंचायत सदस्य मंजुनाथ मुतगी, माजी केडीपी सदस्य प्रकाश पाटील, मारूती हळब, अमन डंबलकर, अरुण महाराज, सुदेश कुडतुरकर मालक (हॉटेल प्रकाश भवन), मनोहर गोवेकर (हॉटेल मलप्रभा) , मारूती गोवेकर, विठ्ठल वेताळ, मिलिंद डांगे ( शिव कृपा ट्रान्सपोर्टस) , मदन महाराज, श्रीराम ट्रेडर्सचे मालक दौलत कोलीकर, प्रकाश ओवुळकर, मोहन पारवडकर, संजय गावडे सुखकर्ता फास्ट फूड) ,  सुरेश पारवावडकर, रमाकांत गोवेकर, विनायक कोटीभास्कर, दर्शन नाईक , विष्णू धाब्याचे मालक शंकर सडेकर, नागेश कांबळे, महादेव तलवार, नागेश सडेकर, नागेश तलवार, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन समीर नेवगेरे, मयूर किनारी अनिल कुर्लेकर यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *