इटगी कॉलेजच्या प्राचार्यांची मनमानी; 40 विद्यार्थ्यांचे दाखले देण्यास नकार..


विद्यार्थी पालकांचा बीईओ कार्यालयाला घेराव; न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही, तालुका ब्लॉक काँग्रेस…

   खानापूर : लोकहित न्यूज ..

         इटगी ( ता. खानापूर) येथील गाजलेले ‘शिक्षणातील राजकारण’ अद्याप थांबण्याचे नाव घेईना. माध्यमिक विद्यालयाच्या वाद शमतो ना शमतो तोच आता येथील राणी राणी चन्नम्मा कॉलेजच्या प्राचार्यांची पुन्हा एक नवा वाद निर्माण केल्याचे समोर आले आहे. या कॉलेजमधील 40 विद्यार्थ्यांचे दाखले काढून देण्यास प्राचार्यांनी नकार दिल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी तालुका गट शिक्षणाधिकारी ( बीईओ) कार्यालयाला घेराव घातला असून, जोपर्यंत दाखले मिळत नाहीत तोवर आंदोलन सुरुच ठेवण्याचा पावित्रा आंदोलकांनी घेतला आहे. शिवाय तालुका ब्लॉक काँग्रेस शिष्टमंडळ पालक विद्यार्थ्यांसह स्वतः बीईओंनी नंदगड पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच शेकण्याचे चिन्हं दिसत आहे.

शिक्षणात राजकारण उपयोगाचे नाही; ब्लॉक काँग्रेस

        दाखल्याअभावी मोठी विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असतांनाही प्राचार्य दाखले का? देईनात असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्यच नसून, शिक्षणात राजकारण उपयोगाचे नाही असा टोला तालुका ब्लॉक काँग्रेसने लगावला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोण खेळते आहे, हेच कळेनासे झाले असल्याचेही त्यांनीं म्हंटले आहे. याबाबत प्राचार्यांना विचारले असता, न्यायालयाचा अडथळा असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, मुलांचे दाखले देण्यास कोणती अडचण आहे, असे मत तालुका ब्लॉक काँग्रेसने व्यक्त केले.  विद्यार्थ्यांसह पालकांनी बीईओ ऑफिस गाठताच लागलीच तालुका ब्लॉक काँग्रेसच्या नेत्यांनी लगेचच हिकडे धाव घेवून बीईओंना जाब विचारला. त्यावर मुजोर प्राचार्य बीईओंचेही ऐकत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बीईओनीच पोलीस ठाणे गाठले, यावेळी पोलिस निरीक्षकांशी या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, सुरेश जाधव, तोहिब, सूर्यकांत कुलकर्णी , बनोशी यांच्यासह इटगी गावचे गावकरी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *