पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांची माहिती; सरकारने भरणार अर्धी रक्कम, अधिक माहितीसाठी हेस्कॉमशी संपर्क साधावा..
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
पंचायत क्षेत्रातील गाव आणि गल्लीतील विद्युत रोषणाईसाठी याआधी पंचायतीला करावा लागणारा संपूर्ण खर्च आता अर्ध्यावर आला असून, यापुढे गल्लीतील शेट लाईट, विद्युत खांब किंवा गल्लीतील विद्युत पुरवठ्यासाठी होणाऱ्या एकूण खर्चापैकी अर्धा खर्च आता सरकार भरणार आहे, तर अर्धा खर्च सबंधित पंचायतीचा भरावा लागणार असल्याची माहिती तालुका पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली. त्यामुळे पंचायतीबरोबर नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे, याबाबत अधिक माहितीसाठी हेस्कॉमशी संपर्क साधण्याचे आवाहन मुतगेकर यांनी केले आहे.
..पंचायतीला कोणत्या योजनेतून खर्च करता येतो?
सबंधित ग्राम पंचायतीला यासाठी पंधरावा आयोग (15 फायनान्स) किंवा निधी टू योजनेतून खर्च करता येतो. एखाद्या गल्लीतील विद्युत पुरवठ्यासाठी लाख रुपये खर्च असेल तर त्यातील पंचायत अर्धे तर सरकारकडून अर्धा खर्च करण्यात येणार आहे. यासाठी पंचायतीने मीटिंग ठराव पास करून हेस्कॉमला याबाबत माहिती द्यायची आहे. त्यानंतर ही या योजनेचा लाभ मिळू शकतो!
प्रतिक्रिया –
सरकारच्या नवीन योजनेनुसार आता पंचायत, नागरीकांना मोठा दिलासा मिळाला नाही. गल्लीतील विद्युत रोषणाईसाठी आता सरकारने अर्धा खर्च करण्याचा घेतलेला निर्णय मोलाचा ठरणार आहे. यासाठी सबंधित पंचायतीनी पुढे येवून याचा नागरीकांना याचा लाभ मिळवून देण्याची गरज आहे.
–विनायक मुतगेकर, अध्यक्ष तालुका पंचायत सदस्य संघटना!






Leave a Reply