कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब; आयोजनासाठी आमदार, तालुका अधिकाऱ्यांसोबत लवकरच होणार बैठक..
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज…
तब्बल बारा वर्षांनी नवचैतन्य घेवून येणाऱ्या बैलूर, देवाचीहट्टी, मोरब आणि बाकनूर या चार गावची लक्ष्मी यात्रा 6 ते 15 मे 2026 दरम्यान होणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या चार गावच्या कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यात्रेसाठी लागणाऱ्या सुविधा आणि व्यवस्थांसाठी लवकरच गावकऱ्यांची आमदार विठ्ठल हलगेकर आणि तालुका आधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, शिवाय, माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ अंजली निंबाळकर यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. मंगळवारी गावकऱ्यांनी खानापूरला मूर्तीकारांचीही भेट घेवून चर्चा केली. यावेळी मंगेश के. गुरव, कृष्णकांत बिर्जे, पांडुरंग गुरव, पुंडलिक नाकाडी, सुरेश कुंभार, लक्ष्मण झांजरे, रवळू गीरमाजी गुरव, रामू नाकाडी, टी . के.बिर्जे, नारायण गावडे, रवळू पां. गुरव, विट्ठल गुरव, पांडुरंग नि. गावडे, शिवाजी तुर्कवाडकर, नारायण कांबळे, धिकृ कांबळे, कोनेरी कांबळे, विठ्ठल कांबळे, पांडुरंग कांबळे आदी उपस्थीत होते.

लक्ष्मी ही देवाचीहट्टीची कन्या; बाकनुर गावकरी देवीचे बसण्याचे आसन तयार करून ते ओढुन बैलूर गावकऱ्यांकडे सोपवितात…
लक्ष्मी देवी ही देवाचीहट्टी येथील कुंभार घराण्यातील कन्या असून, त्यांच्याकडूनच कन्यादान करण्याची पारंपरिक पद्धत आहे. देवीके आसन बाकनुर गावकरी तयार करतात आणि ते बैलूरवासियांना सोपवितात. बैलूर याठिकाणीच देवीचा विधीपूर्वक मोठ्या उत्साहात लाखों भक्तांच्या उपस्थितीत विवाह पार पडतो. यापूर्वी अनेक धार्मिक विधी पार पडतात.
..मोरबमध्ये देवीची पर्णकुटीत ( झोपडी) विधी पार पडतो..
देवीचा विवाह पार पडल्यानंतर मोरबमध्ये नऊ दिवस देवीचे वस्टबी असते, याठिकाणी पर्णकुटीत देवीची पूजा -अर्चा येथील गावकरी पार पाडतात, अशी पुरातन परंपरा आहे.






Leave a Reply