मान येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन; मान्यवरांची उपस्थिती..
कणकुंबी: लोकहित न्यूज ( क्रीडा प्रतिनिधी)
कमी काळात लोकप्रिय झालेल्या क्रिकेट या खेळामुळे सर्व प्रकारचे व्यायाम होते, असा हा गेम आहे. शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भागातही क्रिकेट लोकप्रिय झाले असून, येथून चांगल्या खेळाडूंची वाढती संख्या लक्षात घेता ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. असे सांगतानाच अजूनही म्हणाव्या तशा शासकीय सोयी सुविधा पोहचल्या नसल्या तरी जंगल प्रदेशातही याची मोठी ख्याती आहे, असे मत आ. विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. मान ( ता.खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन केल्यानंतर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिकाजी गावकर होतें. व्यासपीठावर तालुका भाजपचे प्रधान सचिव मल्लाप्पा मारीहाळ, जांबोटी भागाचे भाजप युवा नेते दौलत कोलीकर त्यांचे सहकारी, गावकरी आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. यावेळी मल्लाप्पा मारीहाळ यांनीही मार्गदर्शन करताना, आयोजकांमुळे ग्रामीण भागातील हौशी क्रिकेटप्रेमींना वाव मिळत असून, त्यातून चांगले खेळाडू घडत असल्याचे सांगितले.







Leave a Reply