‘जांबोटी रामेश्वर’ गल्लीत विकास कामांना सुरूवात..


मोरीचे काम जांबोटी पांचातीने हाती घेतले ले खरे, पण ते काम वेळेत झाले नाही तर  पुन्हा आंदोलन; नागरिकांचा इशारा..

जांबोटी: लोकहित न्यूज ..

       गेल्या पंधरा वर्षांपासून जांबोटी पंचायती क्षेत्रातील जांबोटी रामापूर पेठेतील रामेश्वर गल्लीत विकास कामांच्या बाबतीत ग्राम पंचायतीने सोयीस्कर दुर्लक्ष केले होते, त्यामुळे संतप्त गल्लीवासीयांनी पंचायत पीडीओंना निवेदन देत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तसे वृत ‘लोकहित न्यूज’ ने प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या पंचायतीने या गल्लीतील मोरीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यानुसार सदर मोरीसाठी खोदकाम करण्यात आले असून, पुढील काम तत्काळ पूर्ण केले पाहिजेत अन्यथा पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले जाईल असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. परिणामी सदर मोरीच्या खोदकामामुळे सद्या वाहतूक वर्दळीला अडचण होत असल्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे, याची पंचायतीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया –

    शनिवारी आम्हीं पंचायतीला निवेदन दिले होते, त्यावेळी आंदोलनाचा इशाराही दिला होता. लागलीच बदली झालेल्या राजू तलवार आणि नविन पीडीओ मॅडमनी घटनास्थळी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या होत्या. तसे वृत्त लोकहित न्यूज ने प्रसिद्ध करताच पंचायतीला जाग आली आहे. पण, हे काम तत्काळ संपवणे गरजेचे आहे, अशी आमची मागणी आहे. कारण, हाती घेतलेल्या मोरीच्या कामामुळे वाहतूकीला अडचण झाली असून, ती काम पूर्ण झाल्यानंतरच मोकळी होईल.

  • मारुती हळब, सामाजिक कार्यकर्ते, रामेश्वर गल्ली जांबोटी..

           


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *