आ. विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार आणि अक्रम – सक्रम कमिटीची बैठक सपन्न..
खानापूर: लोकहित न्यूज
गेल्या वीस वर्षांपासून सरकारी जमिनी कसणाऱ्या दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन, तीन- चार एक्कर प्रमाणे त्यांच्या मागणीनुसार वाटप करण्यात आल्या. शुक्रवारी तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या अक्रम -सक्रम कमिटीच्या बैठकीत सदर लाभार्थीना जमिनी मंजूर करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते. तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी स्वागत केले. यावेळी माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या शिफारशीनुसार नियुक्त केलेले अक्रम -सक्रम कमिटी सदस्य राजू नाईक, दिशा दीपक कवठंणकर , श्री. भोगुर यांच्यासह कमिटी सदस्य व अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बोलतांना,अनेक वर्षांपासून काबाडकष्ट करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे म्हणावे लागेल असे सांगितले.
कसत असलेल्या आपापल्या जमिनी नावावर करून द्यावे अशा मागणीचे अर्ज सरकारदरबारी केले होते. तसे अर्ज मंजूर करण्याचा अधिकार अक्रम – सक्रम कमिटीला आहे, त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करून कालच्या बैठकीत सदर जमिनी कायदेशीर वाटप करण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी तालुका काँग्रेस युवा नेते दीपक कवठंणकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.







Leave a Reply