तालुक्यात नादुरुस्त बसमुळे वाढते अपघात; शेतकऱ्यासह म्हशीला धडकली बस, प्रसाद पाटील यांच्यासमोरच बसचा प्रकार उघड ..
खानापूर : लोकहित न्यूज
खराब झालेल्या बस गाड्या तालुक्यात चालवण्यात येत असून, त्यामुळे विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या जीवाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होऊ शकतो, असा प्रकार घडलाच तर जबाबदार कोण? असा प्रश्न विचारत गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी खानापूर डेपो मॅनेजरना चांगलाच ‘दम’ दिला . त्यावर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्याने यात सुधारणा करण्याची हमी दिली.
…शेतकऱ्यासह म्हशीला बसची धडक; प्रसाद पाटील यांच्या समोरच नादुरूस्त बसचा प्रकार उघड ..
एका ठिकाणी नादुरुस्त बसने शेतकऱ्यासह म्हशीला धडक दिली. यावेळी उपस्थित असलेल्या ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी चालकाला झालेल्या घटनेबद्दल विचारले असता, चालकाने बसची स्थीती दाखवून दिली. त्यात सदर बसचे इंजिन,गियर,सर्वच वस्तू नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले. शिवाय भंगारात काढलेल्या बस गाड्या मॅनेजर चालवत असल्याचे यावरून स्पष्ट झाले. तालुक्यातील बरीच खेडी घाट परिसरात वसल्याने रस्तेही धोकादायक आहेत, त्यामुळे चांगल्या ‘कंडीशन‘ मध्ये असलेल्या गाड्या सोडण्याची गरज आहे. असे असताना डेपो मॅनेजरांकडून जाणीवपूर्वक नादुरुस्त बस सोडल्या जातात. त्यामुळे सामान्य प्रवाशी आणि विद्यार्थांच्या जीवाशी खेळ केला जातो की काय? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारण्यात येत आहे. यात आता तरी सुधारणा होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात सकाळीं 9 ते 11 च्या दरम्यान बसची संख्या कमी असल्याने जीव धोक्यात घालून लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना प्रवास करावा लागतो.
प्रतिक्रीया –
नादुरूस्त बस असल्याचे माझ्या निदर्शनास आले , शिवाय एका शेतकऱ्याला व त्यांचा सोबत असलेल्या म्हशीलाही बसची धडक बसल्याचा प्रकार घडला. याबाबत सदर चालकाला विचारले असता, त्यांनी बसची स्थिती उघड करुन दाखवली . त्यावर लागलीच मी डेपो मॅनेजरांशी संपर्क साधून जाब विचारला. तात्काळ यात सुधारणा करण्याची हमी मॅनेजरांनी दिली.
– प्रसाद पाटील, ग्राम पंचायत सदस्य गर्लगुंजी..







Leave a Reply