जांबोटी कृषी पत्तीनचे मॅनेजर,सचिव कोणत्या ?दौऱ्यावर; कार्यालयाचा कारभार मात्र, वाऱ्यावर… मोबाईलही नोट रीचेबल…


अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांची तालुका व जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांकडे तक्रार; शेतकऱ्यांचे पैशे वाटप करण्याचा आदेश ,सोसायटी च बंद असल्यामुळे कार्य करणार?

 


जांबोटी: लोकहित न्यूज

        कोणतेही कारण नसतांना किंवा सुट्टी न घेता जांबोटी कृषी पत्तीनचे मॅनेजर खंडोबा राऊत आणि सचिव श्रीनाथ खाडे हे दोघेही  आज (मंगळवारी) कामावर आले नसून, ते कोठे बेपत्ता आहेत याचा थांगपत्ता लागेनासा झाल्यामुळे अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी जिल्हा व तालुका नियंत्रण (ARO) आणि (DRO) यांच्याकडे तक्रार केली आहे. परिणामी आज सकाळी 10.30 वाजता सोसायटी बंद असल्याचे अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांच्या निदर्शनास आले, लागलीच त्यांनी मॅनेजर व सचिवांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे सोसायटीचा कारभार वाऱ्यावर पडला असून, गांभीर्याची बाब म्हणजे या काळात कोणतीही हाणी अथवा कार्यालयीन कामात अडथळा आल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय  मंजूर झालेली पत्त शेतकऱ्यांना वाटप करण्याचा आदेश तालुका अधिकाऱ्यांनी दिला आहे. वेळेत पैशे भरूनही आम्हीं शेतकऱ्यांना पुन्हा पैशे वेळेवर नाहीं दिले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, अशा परिस्थितीत मॅनेजर आणि साचिवही गायब झाले असून, त्यांचे मोबाईलही बंद आहेत. काय म्हणावे या कारभाराला असाही सवाल तक्रार अर्जात त्यांनी केला आहे.

     …सदर तक्रारीत,

        आज सकाळी 10.30 च्या दरम्यान मी नेहमीप्रमाणे सोसायटीमध्ये गेले होते, पाहते तर काय सोसायटी कुलूपबंद होती. लागलीच मॅनेजर खंडोबा राऊत आणि सचिव श्रीनाथ खाडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे दोघांचेही फोन बंद होते. याकाळात सोसायटीच्या बाबतीत कोणतीही हाणी अथवा कार्यालयीन कामात अडथळा आल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांनी तक्रार अर्ज स्वीकारून चौकशी करण्याची हमी दिली आहे.

17 सप्टेंबर 2025 च्या पर्यंत नंदगड मार्केटिंग निवडणुकांसाठी ठराव देण्याचा सरकारकडून आदेश ; मॅनेजर नसतांना कशे?

          नंदगड गावातील टी.ए.पी.सी.एम.एस च्या संचालकांच्या  निवडणूका यंदाच असून, 17 सप्टेंबर 2025 पर्यंत सोसायटीचा ठराव देण्याचा आदेश सबंधित खात्याकडून (सरकार) आला आहे. अशावेळी मॅनेजर आणि सचिव हे दोघेही बेपत्ता असल्याने संशय असून, कार्यालयीन फॉर्म, ठराव पुस्तिकेसह इतर कागदपत्रे मॅनेजरकडे आहेत की, कार्यालयात आहेत हे कळेनासे झाले आहे. या चार कारणांमुळे सोसायटीचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वा नोंदवण्यासाठी अडचण येत आहे. सदर दोघेही स्वतःहून पळून गेले की, कोणी अपहरण केले असा मला संशय आहे, शिवाय त्याबद्दल माझी रीतसर तक्रार आहे, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी जिल्हा सहाय्यक निबंधकांकडे केली आहे.

        


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *