सीआरपीएफ दल म्हणजे देशाचे ‘कवच कुंडल ‘ : केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार


तोराळी (बेळगांव) येथील 36 कोटी निधीतून साकारलेल्या इमारतींचे लोकार्पण; वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती !

 

तोराळी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

     केंद्रीय पोलिस दल अर्थात सीरआरपीएफ ( कोब्रा) बटालियन म्हणजे देशाचे कवच कुंडल असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी व्यक्त केले. तोराळी ( ता. खानापूर) येथील सीआरपीएफ ( कोब्रा)  प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेल्या इमारतींना लोकार्पण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. बाजुला केंद्रीय दक्षिण रिझर्व पोलिस अप्पर पोलीस महानिरीक्षक रवीदीप सिंह साही, केरळ -कर्नाटक सेक्टर महानिरीक्षक डॉ.विपूल कुमार, बंगळूर महानिरीक्षक एन. एन. एस .एस राव , डीआयजी रविंद्र एल.एम, केंद्रीय पोलिस दल ,(निर्माण) उप महानिरीक्षक सुभाष शर्मा, अधीक्षक (अभियंता) बी. श्रीनिवास, कमांडंट राजेश कुमार, खानापूरचे आ.विठ्ठल हलगेकर, बेळगांव दक्षिणचे आ. अभय पाटील, बेळगांव जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद, बैलहोंगल डीवायएसपी डॉ. वीरेय्या हिरेमठ उपस्थित होते. डीआयजी रविंद्र एल. एम यांनी स्वागत केले.

     केंद्रीय मंत्र्यांना सलामी देवून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना, केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार म्हणाले की, आपल्या देशाच्या सुरक्षेत सीआरपीएफ (कोब्रा) दलाचे मोठें योगदान आहे. देशातील नक्षलवाद, उग्रवादी यांचा बीमोड करण्यास हे दल कायमच तत्पर असते, त्यांची कार्यक्षमता मोठी आहे. भारत सरकार कायम त्यांचा पाठीशी राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची संरक्षण व्यवस्था अधिकच सक्षम झाली आहे. आजच्या गौरवशाली कार्यक्रमाने मी भारावून गेलो आहे. येथील येथील केंद्राची प्रशिक्षणाची पद्धत आणि येथून घडणारे अधिकारी देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत असेही ते म्हणाले.  यावेळी स्वागत करतांना डीआयजी रविंद्र एल.एम यांनी भारत सरकारचे अभिनंदन केले. याठिकाणी विकास करण्यासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे येथील विकास वेगाने पुढे सरकत असल्याचे ते म्हणाले.

36 कोटी निधीतून प्रशिक्षण इमारत, ए . व्ही कक्ष आणि 180 बॅरेक इमारतींची निर्मिती…

      केंद्रातून मिळालेल्या 36 कोटींच्या निधीतून प्रशिक्षण इमारत, ए. व्ही इमारत व 180 बॅरेक पुरुषांची इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्वयंपाक, शिक्षण तसेच नवनवीन तंत्रज्ञान योजना आखण्यास मदत होईल.

     यावेळी गोल्याळी ग्राम पंचायत अध्यक्ष नामदेव गुरव, माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष नामदेव पाटील, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, देवाचीहट्टी ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, माजी ग्राम पंचायत सदस्य पुंडलिक ल. पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत, व्यंकट पाटील, नारायण पाटील, बाबुराव, राजाभाऊ मादार आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *