महिन्यातच रस्त्याची अक्षरशः चाळण; कोटींचा निधी पाण्यात , राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचा डोळेझाकपणा; याला वाली कोण?
जांबोटी: लोकहित न्यूज
आधीच वनखात्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे रुंदीकरण रखडले, त्यात असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोटींचा निधी मंजुर होतो पण, त्यानुसार काम होत नाही! एकपदरी रस्ता असल्याने वाहणकोंडी, अपघात, वाहने बाजूला जाण्याचे प्रकार नेहमीचेच! अशी दशा आणि दुर्दशा जांबोटी -चोर्ला रस्त्याची होवून बसली आहे, असे असताना याची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रीय रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना याचे कोणतेच सोयसुतक नाही, त्यामुळेच त्यांनी या रस्त्याच्या देखबालिकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या रस्त्याला कोण वाली? च उरला नसल्याचे चित्रं आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कालमणीजवळ आधीच एक ट्रक नादुरुस्त होवून थांबला होता, त्याला ओव्हरटेक देणाऱ्या दुसऱ्या ट्रकचे चाक पूर्णपणे रूतल्याने सदर ट्रक पलटी झाला आणि त्यामुळेच बेळगांव आणि गोव्याकडील वाहतूक सकाळीं 11 वाजेपर्यंत ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्हीं बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
…कोटींचा निधी पाण्यात; राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे (NHI)तोंडावर बोट…
रणकुंडये ते चोर्लापर्यंतच्या 50 किमी अंतरच्या रस्त्यासाठी 56 कोटींचा निधी मंजूर आहे, त्यातून डबल कोटींग डांबर टाकणे, जीर्ण झालेल्या लहान- मोठ्या मोऱ्याची ( लहान ब्रीज) पुन्हा बांधणी करणे, कुसमळीकडील नदीवरील पुलाची उभारणी करणे ही सर्व कामे उत्कृष्ट करण्याचा सरकारचा आदेश आहे. मात्र, त्यानुसार काम झाले नसून, पूर्वी असलेल्या डांबरावरच डांबर टाकून स्वस्तात काम उरकून घेण्याची घाई कंत्राटदाराने केल्याने महीन्यात रस्ता उधळला आणि तळी साचली आहेत. त्यामुळे कोटींचा निधी पाण्यात गेला असून, राष्ट्रीय रस्ते विकास मंडळाच्या (NHI)अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट घेतले आहे. त्यामुळे या रस्त्याला वाली कोण ? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारण्यात येत आहे..






Leave a Reply