कुसमळीतील श्री’वक्रतुंड ‘ मंडळाच्या रक्तदानाने अनेकांना मिळणार जीवनदान’…


पाच वर्षांपासून केले जाते शिबिराचे आयोजन ; यंदाच्या शिबिरात भरभरुन प्रतिसाद मिळाला असून, 35 युवकांनी केले रक्त ‘ दान…

      जांबोटी: लोकहित न्यूज

            कुसमळी (ता. खानापुर) येथील श्री ‘वक्रतुंड ‘ मंडळाच्यावतीने दरवर्षी होणार  रक्तदान शिबिर हे जणू अनेकांचे आयुष्य फुलवणारेच ठरते! गेल्या पाच वर्षांपासून हे शिबीर रबिवण्यात येते. आज शेवटची घटका मोजणाऱ्या देशातील बहुतेक रुंग्णांना रक्ताची गरज लागते आणि  त्यांना अशा दानशूर युवकांमुळे जीवनदान मिळते आणि मिळाले आहे, अशा अनेक घटना याची साक्ष देतात. त्याचाच एक भाग म्हणून कुसमळी येथील युवकांनी तर अनेक वर्षांपासून रक्तदानाचा जणू विडाच उचलला आहे. त्यांनी अशा शेकडो शिबिरांमध्ये भाग आपले मोलाचे रक्त देवून अनेकांच्या अंधारमय जीवनात ‘प्रकाश’ आणला आहे. कुसमळीच्या आपल्या गावात ‘ वक्रतुंड ‘ गणेश मंडळाच्यावतीने नुकतेच आयोजीत करण्यात आले होते. त्यात 35 दानशूर युवकांनी आपले मोलाचे रक्तदान केले. याबद्दल भागातून त्यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत, पवन गायकवाड, बाबुराव यांच्यासह शेकडो गावचे युवक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांचेही सहकार्य लाभले.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *