राजवाडा जांबोटी येथील देसाईवाडा ( गल्ली) पाणी, रस्ते आदी सुविधांपासून वंचित…
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
‘ राजवाडा जांबोटी’ ही जांबोटीची ओळख असून, ऐतिहासिक काळातील साक्ष देते. याच ठिकाणीं देसाई गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वीची ‘वतनदार ‘ देसाई गल्ली ‘समस्याग्रस्त’ बनली आहे, असे असताना जांबोटी पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. याठिकाणी रस्ते,पाणीसह सर्वच समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या तात्काळ सोडवण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई यांना देसाई गल्लीवासिय्यांतर्फे देण्यात आले. सदर निवेदन स्वीकारून लवकरच या निवेदनाचा विचार केला जाईल असे आश्वासन उपाध्यक्ष सुनिल देसाई यांनी नागरिकांना दिले.
…काय आहे त्या निवेदनात….?
जांबोटी राजवाडा येथील आम्हीं रहिवाशी असून, आमची गल्ली ही वतंनदारांची असून गावच्या सुधारणेत या गल्लीचे योगदान आहे. मात्र, आतापर्यंत सरकारी सोयी- सुविधांपासून अद्याप वंचितच राहिली आहे. आमच्या गल्लीतील रस्ता करावा, पाणी समस्या सोडवावी, शिवाय इतरही नागरी समस्या दीपावळीच्याआधी सोडवण्यात याव्यात अशी जोरदार मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले, यावेळी सुरेश कळेकर, प्रशांत देसाई, राजकुमार देसाई, पुंडलिक देसाई, परशुराम देसाई, महादेव देसाई, रघुनाथ देसाई, हणमंत देसाई, वेंकटेश देसाई, विठ्ठल ना. देसाई, अनिल कळेकर, प्रल्हाद कळेकर आदी उपस्थित होते.







Leave a Reply