…हिंदू पवित्र स्थळांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही… सरकारला हिंदूंचा इशारा…


खानापुरात हिंदू संघटना बांधवांचा भव्य मोर्चा; तहसीलदारांना निवेदन..

खानापूर: लोकहित न्यूज

        गेला महिनाभर मृतदेह प्रकरणामुळे देशातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मस्थळाची काहीं हिंदू विरोधी प्रवृत्तींनी जाणीवपूर्वक बदनामी चालविली आहे. एक विशेष पथक स्थापन करून धर्म स्थळाच्या अनेक ठिकाणीं खोदकाम करण्यात आले. पण, हाती काहीच लागले नाही. कोणी एकट्याने मी अमुक तेवढे मृतदेह दफन केले म्हणून सांगत, आजूबाजूची जमीन खोदकाम करण्यास भाग पाडले. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. विनाकारण का? ही बदनामी आणि कोणी केली कशासाठी? याचा खुलासा सरकारने करावा अन्यथा आम्हीं आमच्या पद्धतीने विचार करू असा इशारा भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी बोलतांना दिला आहे. या प्रकरणामागे कोण कोण आहे, याचा तात्काळ शोध सरकारने लावावा अशी मागणी आ. विठ्ठल हलगेकर यांनी केली आहे. हिंदू मंदिरेच का? बदनाम केली जातात, कोणाचे हे षडयंत्र याचा खुलासा व्हायलाच हवा असे सांगत जोपर्यंत याची सखोल चौकशी होत नाहीं तोवर आम्हीं गप्प बसणार नाही असा खणखणीत इशारा जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी दिला. यावेळी धर्म स्थळ बाबत झलेल्या विनाकारण बदनामीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, या आशयाचे निवेदन ग्रेड टू तहसील  यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, विद्यमान अध्यक्ष बसवराज सानीकोप, ॲड. चेतन मनेरीकर, राजेंद्र रायका,  एमडी सदानंद पाटील, तालुका भाजप सचिव गुंडू तोपिनकट्टी, मल्लापा मारीहाळ, भरमानी पाटील, अनंत सावंत याच्यासह हजारो हिंदू बांधव व महिला उपस्थित होत्या.

       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *