,

याआधीचे डीसीसी इलेक्शन गुपचूप गुपचूप :: आ. हलगेकर


गेल्या वीस वर्षात डीसीसी बँकेत तालुक्यांतील किती युवक -युवतींना मिळाल्या नोकऱ्या? विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा शेतकऱ्यांना सवाल…

     बिडी: लोकहित न्यूज

           जिल्हा मध्यवर्ती (सहकारी) डीसीसीचे यापूर्वीचे राजकारण अर्थात निवडणूक ही गुपचुप चालत होती. एका खोलीत संचालकांना बसवून शेतकऱ्यांच्या माघारी हे सर्व चालायचे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा विकास झाला नसून, तालुक्याचा कारभार पाहणाऱ्यांचाच विकास झाल्याचे दिसून येत आहे. पण, आज आम्हीं तुमच्या समोर आलो आहोत. तुमच्या हितासाठी कायम प्रयत्नशील राहीन, तसा बदल हवा असेल तर तुम्हीं आम्हाला भरभरून पाठिंबा द्यावा असे सांगतानाच यावेळी बदल हा नक्कीच होणार आहे, असे आ. विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले. बिडी (ता.खानापूर) येथे गुरुवारी शेतकरी संपर्क (रयत) केंद्राचे भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, किशोर मीठारी, सुरेश अंगडी, आमटे कृषी पत्तींनचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर, यशवंत बिर्जे, राजू सिद्धनी, महिला काँग्रेस अध्यक्षा सुरेखा पाटील, यशवंत बिर्जे, भरमानी पाटील यांच्यासह तालुक्यातील 16 संघांचे अध्यक्ष उपस्थित होते.  पुढे बोलतांना,आ. हलगेकर म्हणाले की, मध्यवर्ती बँकेत परिवर्तन घडवण्यासाठी मी , राजू सिद्धनी आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी असे तिघे जण रिंगणात आहोत. एका निवड समितीची निर्मिती करण्यात आली असून, त्यांच्याकडून तिघांपैकी एकाची निवड  निवड समितीकडून होईल, असे सांगतानाच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या रयत संपर्क केंद्रासाठी 25 लाखाचा निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे असेही श्री. हलगेकर  बोलतांना स्पष्ट केले.

..विस वर्षात डीसीसीमध्ये किती युवक युवतींना नोकऱ्या- चन्नराज हट्टीहोळी…

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी विद्यमान संचालकांचा चांगलाच समाचार घेत, गेल्या वीस वर्षात खानापूर डीसीसीमध्ये अनेक नोकऱ्या आल्या होत्या, त्यामध्ये तालुक्यातील किती युवक युवतींना मिळाल्या हे तुम्हीच सांगा असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांना केला. ते म्हणाले आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रिंगणात आहोत, तुमचा आशीर्वाद हवा आहे. यावेळी नक्कीच बदल घडवूया असेही ते म्हणाले..

बिडीत  भरमानी पाटील गरजले…..

   तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेटून उठणे गरजेचे असून, यावेळी नक्कीच बदल घडवूया असे सांगताना यापुढे शेतकऱ्यावर होणारा अन्याय्य कदापी सहन केला जाणार नाही. विठ्ठल हलगेकर यांनी दोन रुपयांच्या फंडावर कोटींची सोसायटी उभारली आहे. त्यांचे यावेळी हात बळकट करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

   

यशवंत बिर्जे काय म्हणाले…

      युवा नेते यशवंत बिर्जे यावेळी बोलतांना म्हणाले की, आजचा गुरुवारचा दिवस असून, साक्षात त्रिदेव अर्थात दत्त याठीकानी अवतरले आहेत, त्यांना आम्हीं यावेळी संधी द्यायची आहे..

. सहकार हाच माझा धर्म असताना मी हे क्षेत्र सोडायचे? : आमदार हलगेकर

     दोन रुपयांच्या फंड गोळा करून आज 500 कोटींची महालक्ष्मी सोसायटी उभी केली आहे, असे असताना काहीं जण मला क्षेत्रात तुम्हीं पडू नका म्हणून सांगतात हे तुम्हाला तरी पटते काय?: असा सवाल शेतकरयांनना करत बोरगांव ( निपाणी) कृषी पत्तींन संघाचा आदर्श घ्यावा असे सांगताच, या सोसायटीत व्यवहाराबरोबर एकाच छताखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. मोठ मोठे उद्योग उभारून शेतकरयांना आर्थिक बालोत्तर बनवले आहे, तसे खानापुरात आजतागायत का? होवू शकले नाही तुम्हीच सांगा असेही ते म्हणाले..

चौकट –

   व्यासपीठावर तब्बल 16 पीकेपीएस अध्यक्षांची उपस्थिती

      बिडीत झालेल्या सदर सभेत तब्बल 16 विविध पीकेपीएस अध्यक्षांची उपस्थिती ही विजयाची नांदी मानली जात आहे. या सर्व अध्यक्षांनी एकच शब्द देवून उपस्थिती लावल्याचे यावेळी सूचित करण्यात आले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *