पाच दिवसापूर्वी अतिशय सुंदर बैलजोडी वाहून शेतकऱ्याचे नुकसान झाले होते..
खानापूर: लोकहित न्यूज
बैलजोडी ही शेतकऱ्याच्या जीवनाचा आधार म्हणून ओळखला जातो . तोच आधार नाहीसा झाला तर मात्र, शेतकऱ्याचे दोन्हीं हात गमावल्यासारखी परिस्थिती आहे. तशीच परिस्थिती बेकवाड (ता.खानापूर ) येथील एका शेतकरी कुटुंबावर आली आहे. मागच्या आठवड्यात सुंदर अश्या बैलजोडीचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळें संबधित शेतकऱ्याला मोठी नुकसान सहन करावा लागली आहे. गुंजाप्पा पाटील रा. बेकवाड ( ता.खानापूर) असे सदर शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांच्या बैलजोडीच्या नुकसानीची दखल सामाजिक व राजकीय क्षेत्रातून घेण्यात आली असून, नुकतेच सामाजिक कार्यकर्ते व गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे सदस्य प्रसाद पाटील यांनी गुंजापा पाटील यांची घरी भेट घेऊन सांत्वन केले शिवाय दहा हजाराची आर्थिक मदत केली. यावेळी सदानंद पाटील, रामचंद्र लोहार आदी उपस्थित होते.b
Leave a Reply