सिद्धानी हे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे कट्टर समर्थक: तालुक्यातील कृषि पत्तींन अध्यक्ष – संचालकांकडे आशिर्वादाचे साकडे….
खानापूर: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)
जसजसे दिवस जवळ येतील तसे खानापूर डीसीसी बँक अर्थात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाची निवडणूक रंगत स्थितीत येण्याचे चित्रं दिसत. परवा परवा विद्यमान संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी भालचंद्र जारकीहोळी यांची खानापुरात बैठक घेवून जारकीहोळी बंधूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हे दाखवून दिले आहे, त्याचवेळी तालुक्यात दुसऱ्या गटाकडून निवडणूक लढवण्याची जोरदार चर्चा सुरू होती, तसेच होतांना दिसत आहे. गर्लगुंजी कृषी पत्तीन ( पीकेपीएस संघ) सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजू सिद्धानी यांनीही डीसीसी बँक संचालकपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा नुकत्याच खानापुरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. सिध्दानी हे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळें त्यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांचा पाठिंबा असणार यात तिळमात्र शंका नसेल. कारण, परवाच्या अरविंद पाटील यांनी भाजपचे माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी यांच्यासोबत खानापुरात बैठकीत आमदार विठ्ठल हलगे हे उपस्थित नव्हते! यावेळी बोलतांना खुद्द भालचंद्र जारकीहोळी यांना सांगावे लागले की, माजी आमदार अरविंद पाटील व विद्यमान आमदार विठ्ठल हकगेकर यांच्यात असलेली शाब्दिक नाराजी दूर व्हावी, शिवाय ना.जारकीहोळी म्हणाले की, दोघेही भाजपचे नेते असून, एकाने विधानसभेला मदत केली होती आता दुसऱ्याने अर्थात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सहकार क्षेत्र अर्थात डीसीसी संचालकपद अरविंद पाटील यांच्यासाठी सोडावे असे सूचित केले होते. त्यावर आमदार हलगेकर यांचे प्रत्युत्तर कोठेही ऐकावयास मिळाले नाही.. त्यावरून हे राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे थोड्याच दिवसात कळेल!
……तालुक्यातील शेतकरी आणि युवकांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढविणार- राजू सिध्दानी……
तालुक्यात 58 कृषी पत्तिन सोसायट्या असून, त्या सर्वाशी माझे घनिष्ठ संबंध आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या असून, यामध्ये असे कळून आले की, काहीं संस्थांमध्ये (पीकेपीएस) शेतकऱ्यांना ‘पत्तच ‘ मंजुर केली नसल्याने सरकारी सब्सिडीचा कोणताच फायदा मिळाला नसल्याचे आढळून आले आहे. तर तालुक्यांतील युवकांना सोडून बाहेरील लोकांना खानापूर डीसीसी बँक कामगार भरतीत भरून घेण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक युवकांवर अन्याय झाला आहे. या दोन्हीं समस्या दूर करण्यासाठी मी रिंगणात उतरल्याचे गर्लगूंजी कृषी संघाचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक राजू सिद्धानी यांनी खानापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तालुक्यातील सर्व कृषी पत्तींन संघांच्या संचालक मंडळ आणि कामगारवर्गाशी चांगले संबंध ठेवत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळवून देणे असा माझा मानस असल्याचेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.
…..राज्यस्तरीय राजकारणाचा तालुक्यावर परिणाम..?
राज्यात काँग्रेस सरकारच्या गेल्या काळात आणि चालू सत्तेच्या काळातही राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार आणि सतीश जारकीहोळी यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे. त्याचाच परिणाम खानापूर तालुक्यावर दिसून येत आहे. अलमट्टी जलाशयातील पाण्याच्या राजकारणापासून ते राज्यातील प्रतिष्ठेच्या जागा बनलेल्या विविध मंडळांच्या पदापर्यंतची निवडणूक या दोन्हीं नेत्यांच्या प्रतिष्ठेची बाब म्हणावी लागेल! यातील एक म्हणजे केएमएफ दूध डेअरी च्या निवणूकीचा वचपा काढण्यासाठी खानापुरात चढाओढ लागली आहे का? अशी शंका घेण्यास कोणतीही अडचण नसेल. डी. के शिवकुमार यांचे कट्टर समर्थक म्हणून बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे पाहिले जाते. हेब्बाळकर ह्या मूळच्या खानापूर तालुक्यातील हेब्बाळ या गावच्या रहिवाशी असल्याने खानापूर तालुक्याच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपला मुलगा मृणाल हेब्बाळकर यांना उतरण्याची तयारी करू पाहत आहेत का? तसें असेल तर आतापर्यंत डीकेंचे अडसर बनून राहिलेले जारकीहोळी बंधू गप्प राहण्याचा प्रश्नच राहण्याचा प्रश्नच नाही. त्याचाच परिणाम खानापूर आता डीसीसी बँकेच्या राजकारणात दिसून येणार हे नक्कीच! त्यामुळें या निवणुकिची रंगीत तालीम होण्याचे चिन्हं आहे……..
…..आ. विठ्ठल हलगेकर आणि मंत्री हेब्बाळकर यांची युती काय?…
आ. विठ्ठल हलगेकर आणि तालुक्याचे विधान परिषद सदस्य असणारे चन्नराज हट्टीहोळी हे दोन्हीं नेते तालुक्यांतील दोन -तीन कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आले. हे चित्रं याआधी कमी होते. त्यामुळें प्रश्न उपस्थित होतो की, या दोघांची डीसीसीमध्ये युती तर होणार नसेल ना ? भाजपचे माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी यांच्या बैठकीत भाजपचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यावरून शंका घेण्यास हरकत नसेल का? असेच म्हणावे लागेल. कारण, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी पक्षप्रेम लागत नाही हे अनेकदा दिसून आले आहे. कारण , खुद्द विधान परिषद सदस्य हट्टीहोळी यांनीही स्वतः खानापूर डीसीसी संचालक निवडणूक लढवण्याची घोषणा करत तालुक्यांतील कृषीपत्तीन संचालक अध्यक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्यानुसार काहीं संचालक अध्यक्ष त्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, त्यानंतर हट्टीहोळी यांची कोणतीच हलचाल दिसून आली नाही. त्याचवेळी त्यांची आणि आ.हलगेकर यांची दोन – शासकिय कार्यक्रमात जवळीक पहायला मिळाली. त्यामुळें तालुक्यांच्या डीसीसी बँकेचे राजकारणही त्याचाच भाग असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे….






Leave a Reply